पत्रकार कसे बनावे?

शेअर करा

पत्रकार कसे बनावे?

आज पत्रकारीतेला आपण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दर्जा देत असतो. आणि पत्रकारीता म्हटल की पहिले आपल्याला वर्तमानपत्र आठवतात. कारण आज जगातील प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरूवात गरम चहा आणि हातात वर्तमान पत्र ह्या दोन गोष्टींद्वारेच होत असते. वर्तमान पत्रातील हे लेख पत्रकार लिहित असतो. ह्यात काही छोटे मथळे देखील असे असतात जे इतर लेखकांनी लिहिलेले असतात.

वर्तमानपत्रात आपण जे काही लेख वाचत असतो त्या पैकी बहुतेक लेख हे भ्रष्टाचार, चोरी, लुट, हत्या इत्यादी गंभीर विषयांवर असतात. ज्यावर पत्रकाराने लेखन केलेले असते. कधी मवाळ तर कधी जहालवादीपणे.

आजच्या लेखातुन आपण पत्रकार आणि पत्रकारीता ह्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तसेच पत्रकार बनण्यासाठी आपण काय करायला हवे हे जाणुन घेणार आहोत.

पत्रकार म्हणजे काय ?

पत्रकार हा समाजातील एक असा आधारस्तंभ असतो. जो समाजात घडत असलेला भ्रष्टाचार, चोरी, लुटमार अशा गुन्हयांची माहीती संकलित करत असतो आणि समाजासमोर, जनतेसमोर ह्या सर्व गुन्हयांचा खुलासा करत असतो.

पत्रकार हे किती प्रकारचे असतात?

पत्रकारीता हे एक खुप अतिविस्तृत क्षेत्र आहे त्यामुळे इथे पत्रकार हा एकाच क्षेत्रात असलेला आपणास दिसुन येत नाही. आज प्रत्येक क्षेत्रात पत्रकार असलेला आपणास दिसुन येतो. मग ते आर्थिक क्षेत्र असो किंवा क्रिडा.

चला तर मग जाणुन घेऊ पत्रकारांचे विविध प्रकार.

1) क्रिडा क्षेत्रातील पत्रकार : हा पत्रकार क्रिडा क्षेत्रातील घडामोडींवर, विविध विषयांवर तसेच घडत असलेल्या घटनांवर लेखन करत असतो.

2) गुन्हेगारी क्षेत्राविरूदध काम करणारा पत्रकार : समाजात ज्या काही गुन्हेगारी घटना घडत असतात त्याविरुदध रिपोर्टींग करण्याचे तसेच लेखन करण्याचे काम हा पत्रकार करतो.

3) स्त्रीवादी महिला पत्रकार : ह्या पत्रकार समाजातील स्त्रियांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराविरूदध लढा देण्याचे आणि त्याविरूदध लेखन करण्याचे काम करत असतात.

4) बाल पत्रकार : बालपत्रकार हे लहान मुलांच्या आरोग्य,संगोपण,त्यांचे खेळणे इत्यादी अशा बाबींविषयी माहीती देण्याचे कार्य करतात.

5) मनोरंजन क्षेत्रात काम करणारे पत्रकार : लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी वर्तमान पत्र मासिक ह्यात ज्या कथा,गोष्टीविषयी माहीती प्रकाशित होत असतात त्या हे मनोरंजन पत्रकार लिहित असतात.

6) शोध तसेच चौकशी पत्रकार :हे पत्रकार एखाद्या विषयावर तपास करत असतात आणि मग पुर्ण खोल तपास करून झाल्यावर वर्तमानपत्रात त्या विषयी बातमी बनवुन,संशोधनपर लेख लिहितात.

7) आर्थिक क्षेत्रातील पत्रकार :हा पत्रकार आर्थिक क्षेत्राचा तज्ञ असतो. जो आर्थिक क्षेत्राची माहीती देणे हेच कार्य करत असतो.

8). संसदीय पत्रकार : संसद क्षेत्रातील घटना घडामोडींविषयी माहीती देण्याचे काम ह्या पत्रकाराचे असते.

9) चित्रपट क्षेत्रातील पत्रकार : चित्रपट क्षेत्रातील घडत असलेल्या घटना,प्रसंग तसेच इतर घडामोडींविषयी हा पत्रकार माहीती देत असतो.

10) कृषी क्षेत्रातील पत्रकार : कृषी क्षेत्राविषयी म्हणजेच शेतीविषयक माहीती, शेतीसाठी खते, पिक इत्यादींची माहीती हा पत्रकार देत असतो.

पत्रकाराची नोकरी मिळण्यासाठी काय करावे?

जर आपणास मुद्रण क्षेत्रातील पत्रकार बनायचे असेल तर आपण त्यासाठी एखादी इंटर्नशिप अनुभव मिळण्यासाठी करायला हवी. पत्रकारीते संबंधी काही महत्वाचे कोर्सेस असतात ते देखील करून घ्यायला हवे. म्हणजे यानंतर आपल्याला कोणत्याही न्युन चँनलमध्ये तसेच न्युज पेपर मध्ये हमखास नोकरी मिळु शकते.

पत्रकाराला पगार (salary) किती मिळते?

प्रत्येक नवोदित युवा पत्रकाराला सुरूवातीला  १५ ते २० हजार सुरूवातीला साधारणत मानधन मिळत असते. जसजसा त्याचा पत्रकारीता क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्यात वाढ होते. तसतसे त्याचे मानधन देखील वाढवले जाते.

पत्रकार बनण्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता काय असावी लागते?

जर आपल्याला पत्रकार बनायचे असेल तर बारावी नंतर आपल्याला मांस कम्युनिकेशन तसेच पत्रकारीतेची बँचलर डिग्री घेऊन पत्रकारीतेच्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा लागतो. याचसोबत आपण पत्रकारीतेत अधिक अनुभवासाठी मास्टर डिग्री तसेच पीजी डिप्लोमा देखील करू शकतो. नाहीतर एखाद्या संस्थेत एक दोन वर्षाचा इंटर्नशिप कोर्स पुर्ण करू शकतो.

पत्रकारीतेच्या क्षेत्राचे प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी आपण कोणत्या संस्थेत आणि कुठे प्रवेश घेऊ शकतो?

पत्रकारीतेचे शिक्षण घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतो:

1) Symbosis Institute of Mass Communication, Pune

2) Asian College of Journalism, Tamil Nadu

3) Indian Institute for Mass Communication, New Delhi

4) Indian Institute of Journalism and New Media, Banglore

5) International institute of Mass Communication, New Delhi

6) Xavier Institute of Communication, Mumbai

7) Appejay Institute of Mass Communication, New Delhi

पत्रकारीता क्षेत्रात असलेल्या करिअरच्या संधी किती आहेत?

पत्रकारितेचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर आपल्यापुढे करिअरच्या भरपुर संधी असतात. ज्यात आपण कोणत्याही सरकारी,खाजगी वेबसाईट तसेच न्युज चँनलमध्ये पत्रकार म्हणुन रिपोर्टींगचे काम करू शकतो किंवा आपल्याला कुठेही नोकरी करायची नसेल तर आपण स्वतंत्र म्हणजेच फ्रिलान्स पत्रकार म्हणुन देखील काम करू शकतो.

पत्रकाराची जबाबदारी आणि प्राथमिक कर्तव्ये कोणकोणती असतात?

१)आपले काम कोणताही पक्षपात न करता प्रामाणिकपणे करणे.

२) समाजात घडत असलेल्या सर्व घटना प्रसंगांची सर्व सत्य माहीती लोकांपर्यत पोहचवणे. 

देशाच्या, समाजाच्या हितासाठी तसेच कल्याणासाठी एका हाडाच्या पत्रकाराने कसे असायला हवे?

१) देशाच्या,समाजाच्या हितासाठी तसेच कल्याणासाठी एका हाडाच्या पत्रकाराने पत्रकारितेच्या सर्व महत्वपुर्ण नियम आणि सिदधांत यांचे पालन करायला हवे.

२) देशाच्या,समाजाच्या हितासाठी तसेच कल्याणासाठी एका हाडाच्या पत्रकाराने कोणत्याही सामाजिक, आर्थिक तसेच धार्मिक प्रलोभणाला बळी न पडता जे खरे आहे ते जनतेसमोर आणत म्हणजेच सत्य ते मांडत असतो.

३) पत्रकाराने नेहमी जिज्ञासु तसेच चौकस,शोधक वृत्ती असलेला असायला हवे.

४) पत्रकार हा असा असावा ज्याला सर्व प्रकारच्या क्षेत्रांची माहीती आहे. सर्व क्षेत्रांचे उत्तम ज्ञान आहे.

एक यशस्वी पत्रकार बनण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे?

१) जर आपल्याला एक यशस्वी पत्रकार बनायचे आहे तर त्यासाठी आपल्याला भरपुर वाचन करावे लागणार आहे. कारण वाचनाने आपण अधिक समृदध बनत जात असतो.

२) नियमित वर्तमानपत्रांचे वाचन करायला हवे तसेच टिव्ही वरील डेली न्युज बघायला हव्या याने आपल्याला आपल्या आसपास तसेच जगभरातील कानाकोपरामध्ये घडत असलेल्या घडामोडींचे आकलन होत असते. तसेच माहीती मिळत असते.

३) न्युज ऐकण्याबरोबरच न्युज लिहायची प्रँक्टिस देखील करावी लागणार आहे.

४) जुन्या तसेच अनुभवी पत्रकारांच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. त्यांच्याशी चर्चा मसलत करून पत्रकारीतेविषयी अधिक जाणुन घ्यायला हवे.

५)जनतेसोबत संवाद साधण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य जोपासायला हवे.

पत्रकार बनण्यासाठी आपण कोणकोणते महत्वाचे कोर्सेस करू शकतो?

पत्रकार बनण्यासाठी आपण विविध डिप्लोमा तसेच पदवीचे कोर्स करू शकतो. तसेच त्यात अधिक अनुभव प्राप्त होण्यासाठी पी जी डिप्लोमा आणि मास्टर पदवी देखील घेऊ शकतो.

डिप्लोमा कोर्सेस :

●      डिप्लोमा इन जर्नलिझम अँण्ड मास कम्युनिकेशन

●     डिप्लोमा इन जर्नलिझम

●     डिप्लोमा इन ब्राँडकास्ट जर्नलिझम

●      डिप्लोमा इन वेब मीडीया आँनलाईन मिडिया

●     डिप्लोमा इन इलेक्ट्राँनिक मिडिया

●     डिप्लोमा इन प्रिंट मिडिया 

डिग्री कोर्स  :

●     (बी. ए) मास कम्युनिकेशन अँण्ड जर्नलिझम

●     बी. ए इन जर्नलिझम

●     बी. एससी इन मास कम्युनिकेशन

●     बँचलर इन ब्राँडकास्ट जर्नलिझम 

पी. जी डिप्लोमा कोर्सेस :

●      पी जी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँण्ड जर्नलिझम

●      पी जी डिप्लोमा इन जर्नलिझम

●      पी जी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन

●     पी जी डिप्लोमा इन ब्राँडकास्ट जर्नलिझम

मास्टर :

●     मास्टर इन मास कम्युनिकेशन

●      मास्टर इन जर्नलिझम अँण्ड मास कम्युनिकेशन

●      एम ए इन मास कम्युनिकेशन

●     एम एस सी इन मास कम्युनिकेशन


error: Content is protected !!