नागपंचमी हा एक असा सण तसेच उत्सव आहे. जो संपुर्ण भारतात मोठया उत्साहाने,आनंदाने आणि जल्लोषात साजरा केला जात असतो.नागपंचमी ही सर्वसाधारणपणे श्रावण महिण्याच्या शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी सर्वत्र साजरी केली जाते.
हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी सर्व स्त्रिया एकत्र येतात आणि नागदेवताची पुजा,अर्चना करतात. सोबतच त्यांचा आशिर्वाद देखील घेत असतात. हा एक असा एकमेव दिवस आहे ज्यादिवशी आपण ज्या नागाला स्वताचा जीव वाचवण्यासाठी मारायलाही मागेपुढे बघत नाही त्याच नागाची मनोभावे आणि मोठया श्रद्धेने ह्या एकादिवशी आपणा सर्वाकडुन पुजा केली जाते.
नागपंचमी सणाविषयी माहिती
नागपंचमी हा आपल्या हिंदु सणांपैकी एक मोठा सण आहे. ज्याच्याविषयी संपुर्ण माहीती असणे आपल्या सर्वासाठी फारच गरजेचे आहे. म्हणुन आपण आजचा हा लेख नागपंचमी ह्या विषयावर घेणार आहोत. ज्यात आपण नागपंचमी या सणाविषयी सर्व माहीती जाणुन घेणार आहोत.नागपंचमी म्हणजे काय?नागपंचमी कधी आणि केव्हा साजरी केली जाते? नागपंचमी का साजरी केली जाते? हिंदु धर्मात नागपंचमीचे काय महत्व आहे? नागपंचमीचे वैशिष्टय काय असते? नागपंचमी कशी साजरी केली जाते?इत्यादींविषयी आपण जाणुन घेणार आहोत.
नागपंचमी हा एक असा हिंदु धर्मातील उत्सव आहे जो संपुर्ण भारतात साजरा केला जात असतो.ह्या दिवशी सर्व सवासिनी स्त्रिया पारंपारीक वेशभुषा धारण करून एकत्र येतात आणि नागदेवतांची मनोभावे श्रदधेने पुजा,अर्चना करीत असतात आणि त्यांचा आशिर्वाद देखील घेत असतात.

नागपंचमी का साजरी केली जाते? नागपंचमीचे महत्व काय आहे?
असे म्हटले जाते की कालिया नावाचा एक नाग यमुना नदीमध्ये वास्तव्यास होता आणि ह्या नागाचे विष इतके भयंकर होते की संपुर्ण यमुना नदी ह्या विषामुळे विषारी झाली होती. त्या नदीत राहणारी तसेच त्या नदीत जाणारी सर्व सजीव प्राणी पक्षी मरण पावत होते. तेव्हा श्रीकृष्णाने कालिया नागाला यमुना नदी सोडुन पाताळ लोकात जाण्यास भाग पाडले होते. लोकांना त्याच्या भीतीपासून कायमचे मुक्त देखील केले होते. तेव्हापासुन नागपंचमी हा सण साजरा केला जातो आहे.
नागपंचमी केव्हा आणि कधी साजरी केली जाते?
नागपंचमी हा सण संपुर्ण देशभरात 13 आँगस्टला श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी साजरा केला जात असतो.ह्या दिवशी स्त्रिया वारूळाजवळ जाऊन नागदेवतांची पुजा करून त्यांची दुधाने अंघोळ घालतात.आणि मग नागदेवतांचा मनोभावे आणि श्रदधेने आर्शिवाद देखील घेत असतात.
नागपंचमी कशी साजरी केली जाते?
नागपंचमी हा एक वैदिक काळापासुन साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्वाचा सण म्हणुन ओळखला जातो.ह्यादिवशी सर्व सवाशिन स्त्रिया नवीन वस्त्रे परिधान करतात, वेगवेगळे अलंकार घालतात. नटुन थटुन नागदेवतांची पुजा, अर्चना करतात. हळद आणि चंदनाने नाग आणि नागीण तसेच त्यांची पिल्ले ह्यांची चित्रे सर्व स्त्रिया पाटावर काढतात. मग त्याच चित्राला दुध वाहतात, त्याला दुर्वा वाहत असतात तसेच लाही आणि आघाडा देखील वाहतात.
नागपंचमी हा एक असा दिवस आहे ज्यादिवशी नागदेवतांना सर्व सुवासिनी स्त्रिया दुध, साखर आणि पुरणाचा नैवेद्य दाखवतात. ह्या सणाच्या दिवशी विशेषत गव्हाच्या खिरीपासुन,चण्याच्या डाळीपासून तसेच गुळापासून बनवलेली पुरणाची दिंड सर्व स्त्रिया आनंदाने आणि मोठया श्रदधेने बनवतात.
नागपंचमीचे वैशिष्टय काय आहे?
नागपंचमी ह्या सणाचे वैशिष्टय सांगायचे म्हटले तर सत्येश्वर नावाची एक देवी होती आणि तिचा सत्येश्वर ह्या नावाचाच एक भाऊ देखील होता. दुर्दैवाने नाग पंचमीच्या एक दिवस आधीच सत्येश्वरीचा मृत्यु होत असतो. मग ती आपल्या भावाच्या शोकविवंचनेत असतानाच तिला तिचा भाऊ नागाच्या रूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागालाच तिचा भाऊ मानले आणि त्यादिवशी नागदेवताने तिला वचन दिले की जी पण बहिण मला भाऊ मानुन माझी पुजा,अर्चना करेन तिचे रक्षण मी स्वता करेन. त्यादिवसापासुन सर्व स्त्रियांनी मिळून नागाची पुजा करण्याची एक प्रथाच चालू झाली.
नागपंचमीला नागांची जत्रा कोठे भरत असते?
समस्तीपुर हे बिहार मधील असे एक ठिकाण आहे जिथे प्रत्येक नागपंचमीला नागांची जत्रा भरवली जात असते.
नागपंचमी सणाविषयी माहिती या लेखाप्रमाणे इतर माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी विशेष पानाला नक्की भेट द्या
इतर लेख