दात दुखीवर घरगुती उपाय आणि दात दुखीची कारणे

शेअर करा

दात दुखीवर घरगुती उपाय आणि दात दुखीची कारणे:

आज पाहायला गेले तर वयस्कर व्यक्तींपासुन तरुण-तरुणींना देखील दात दुखीची गंभीर समस्या उद्भवत असताना आपणास दिसुन येते आहे.दातांना किड लागणे,दातांमध्ये अन्नाचे कण अडकणे,व्यवस्थित दात न घासणे अशी खुप दातदुखीची कारणे आपल्याला पाहावयास मिळतात.

तसेच दातदुखी ही एक अशी समस्या आहे जी कधीही आणि कोणालाही जाणवते. रात्री अपरात्री किंवा ऐनवेळी जेवण करत असताना देखील आपल्याला ही समस्या उद्भवत असते. मग अशावेळी आपण समोर वाढलेले जेवणाचे ताट बाजुला करून दवाखान्यात किंवा मेडिकलमध्ये जाऊ शकत नाही अशावेळी ताबडतोब दात दुखीवर घरगुती उपाय करणे हाच एक उत्तम मार्ग आपल्यासमोर असतो. 

म्हणुन आजच्या लेखातुन आपण ह्याच दातदुखीची कारणे समजुन घेऊन दातदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करणे गरजेचे आहे तसेच आपण ते का करायला हवेत हे जाणुन घेणार आहोत जेणेकरून आपल्याला आपले दात दुखत असल्यास स्वतः आपल्या दात दुखीवर घरगुती उपाय करता येतील.  

दात दुखण्याची कारणे :

1) दातांना किड लागणे-

आपल्या सर्वाचे दात दुखण्याचे प्रमुख कारण हे दातांना किड लागणे हे असते.मुख्यत्वे लहान मुलांचे दात किड लागल्यामुळेच जास्तीत जास्त दुखत असतात.कारण लहान मुलांपासुन तर मोठया माणसांपर्यत आज सगळयांनाच चाँकलेट आवडत असते.म्हणुन सगळे चाँकलेट खात असतात.पण तेच खाल्लेले चाँकलेट दातांमध्ये जेव्हा अडकते.तेव्हा आपल्या दातांना किड लागणे तसेच त्यांच्यापासुन दुर्गधी येण्यास सुरू होते.

2) दातांची स्वच्छता योग्य पदधतीने न करणे: 

दात दुखीच्या अनेक कारणांपैकी अजुन एक महत्वाचे कारण आहे दातांची स्वच्छता न करणे कारण जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा जेवताना आपल्या दातांच्या मध्ये कुठेतरी अन्नाचे बारीक सारीक कण जसे की पोळीचे अथवा भाजीचे कण अडकुन राहत असतात. आपण दातांची स्वच्छता न केल्याने हेच कण दातात तसेच अडकुन राहतात आणि दाताचा तो भाग कुजतो,त्याला किड लागण्यास सुरूवात होते आणि ह्याच कारणामुळे दात दुखत असतात. 

 3) वेळेवर दात न घासणे : 

सर्वसामान्यत आपण सर्वानी दिवसातुन किमान दोन वेळा दात घासणे फार गरजेचे असते.एक सकाळी झोपेतुन उठल्यावर आणि रात्री झोपण्यापुर्वी सुदधा कारण जेव्हा आपण जेवण करून रात्री झोपत असतो.तेव्हा जेवताना अन्नाचे काही तुकडे तसेच आपल्या दातात अडकुन राहत असतात आणि मग ते अडकलेले अन्नाचे कण असलेला भाग काही दिवसांनी हळुहळु कुजण्यास किडण्यास सुरूवात होते.आणि आपले दात दुखण्यास सुरूवात होते.

दात दुखीवर घरगुती उपाय आणि दात दुखीची कारणे .
toothbrush

दात दुखीवर घरगुती उपाय :

●     बर्फ : आपल्या दाताचा जो भाग दुखत असतो त्यावर आपण कमीत कमी पाच मिनिटांसाठी बर्फाचा खडा लावायला हवा याने आपला दात दुखणे कमी होते आणि दातालाही थंडावा प्राप्त होतो तसेच आराम मिळत असतो.

●     लिंबु: लिंबु हा एक असा घरगुती पदार्थ आहे जो आपल्या घरात नेहमी उपलब्ध असतो. लिंबुमध्ये व्हिटँमिन सी हे भरपुर प्रमाणात उपलब्ध असते. लिंबु घेऊन आपण त्याच्या चकल्याच्या आकाराच्या वडया कराव्यात आणि त्या आपल्या दाताच्या त्या दुखत असलेल्या भागावर लावाव्यात. याने देखील आपल्या दाताला आराम प्राप्त होत असतो.

●     पेरूचे पान: पेरू हे एक असे फळ आहे ज्याचे झाड आपल्या घराच्या परसबागेत तसेच घराच्या मागच्या बाजुला आपण लावत असतो.दात दुखत असल्यावर आपण जर पेरूचे पान दात दुखत असलेल्या भागात ठेवुन चावून खाल्ले तर आपले दात दुखणे काही प्रमाणात का होईना कमी होत असते.

●     बटाटा: बटाटा हा एक असा पदार्थ आहे जो आपण रोज आपल्या आहारात घेत असतो.बटाटयाचा सुदधा दात दुखीवर उपाय म्हणुन वापर केला जात असतो.बटाटयाची वरची साल आपण चकल्यांप्रमाणे सोलुन काढायची आणि त्या चकल्यांच्या आकाराच्या साली आपल्या दाताच्या दुखत असलेल्या भागावर लावायच्या. याने देखील आपले दात दुखणे कमी होते. 

अशा प्रकारे घरगुती उपयोगात येत असलेल्या साधनसामग्रीचा वापर करून देखील आपण दात दुखीवर घरगुती उपाय करू शकता. आरोग्यविषयक लेख वाचण्यासाठी आरोग्य पानाला जरूर भेट द्या.


संबंधित लेख

error: Content is protected !!