त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती

शेअर करा

त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती 

त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे महाराष्ट प्रांतात वसलेल्या नाशिक जिल्हयातील एका त्र्यंबक नावाच्या छोटयाशा गावामध्ये स्थित आहे. येथील ब्रम्हगिरी नावाच्या पर्वतामधुन गोदावरी नदीचा उगम देखील होतो. त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे नाशिक शहरापासुन 28 किलोमीटर एवढया दुर अंतरावर आहे. सदर मंदिराच्या कामाचे सर्व व्यवस्थापण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांकडुन(trust) केले जाते. सदर मंदिरामध्ये येत असलेल्या भाविकांसाठी राहण्याची सोय देखील ह्या मंदिराच्या ट्रस्टकडुनच केली जाते.

त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये एक छोटेसे खड्डे आहे त्या खडड्यामध्येच तीन छोटे छोटे शिवपिंड देखील आहेत. हे तीन छोटे लिंग दुसरे काही नसुन त्रिदेव ब्रम्हा, विष्णु, महेश यांचे प्रतीक म्हणुन ओळखले जाते. एकुण बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक ज्योर्तीलिंग हे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. चला तर मग जाणुन घेऊयात आजच्या लेखातुन त्र्यंबकेश्वर मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती. 

त्र्यंबकेश्वर मंदिरचे वैशिष्टय

●     त्र्यंबकेश्वर मंदिराचे सगळयात महत्वाचे वैशिष्टय म्हणजे ह्या मंदिराचे हे आहे की ह्या मंदिरामध्ये ब्रम्हा, विष्णु, महेश ह्या तिन्ही देवांचे मंदिरातील एक छोटयाशा खडडयामध्ये शिवलिंग असल्यामुळे हे मंदिर ब्रम्हा, विष्णु, महेश यांचे प्रतीक म्हणुन ओळखले जाते. 

●     ह्या मंदिराचे अजुन एक वैशिष्टय हे आहे की त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे पुरातन काळात बनवण्यात आलेले मंदिर आहे.

●     ह्या मंदिराच्या पुर्व दिशेला एक चौकोनी मंडप आहे आणि मंदिराच्या चारही बाजुंना चार दरवाजे बसविण्यात आले आहेत. पश्चिम दिशेला असलेला दरवाजा हा एखाद्या विशेष कार्यप्रसंगीच उघडला जात असतो. बाकी इतर दिवस भक्तजणांना बाकीच्या तीन दरवाज्यांतुन ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रवेश दिला जातो.

●     ह्या मंदिराविषयी असे देखील म्हटले जाते की हे सदर मंदिर काळया शिळेपासुन बनविले गेले आहे आणि ह्या मंदिराच्या आतल्या भागात एक गर्भगृह आहे. त्याच गर्भगृहामध्ये शिवलिंगाची स्थापणा करण्यात आली आहे.

●     गौतम ऋषी आणि गोदावरीने प्रार्थना केल्यामुळे महादेव येथे प्रसन्न होऊन वास्तव्य करण्यास आले आणि त्र्यंबकेश्वर नावाने ते प्रख्यात झाले. 

 त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुजेची वेळ

●     त्र्यंबकेश्ववराचे मंदिर हे पुर्ण आठवडाभर नेहमी उघडे राहत असते

●     महादेवाच्या सोन्याचे मुकुट दर्शनाची वेळ ही सकाळी साडेचार वाजेपासुन पाच वाजेपर्यत असते. 

●     आणि सकाळची मंगळ आरती ही सकाळी साडेपाच वाजेपासुन ते सहावाजेपर्यत होत असते. 

●     मंदिरातील अभिषेकाचा कालावधी हा सकाळी सहा ते सात वाजेपर्यतचा आहे. 

●     आणि समजा आपल्याला मंदिरामध्ये काही विशेष पुजा करायची असेल तर आपण ती सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान करू शकतो.

●     मंदिरातील दुपारची पुजा ही एक ते दीड वाजेपर्यत केली जाते.

●     संध्याकाळची आरती ही रात्री सातवाजेपासुन ते नऊ वाजेपर्यत केली जाते. 

त्र्यंबकेश्वराचे मंदिर कोणी बनवले

त्र्यंबकेश्वर ह्या मंदिराच्या पुर्णनिर्माणाचे कार्य तिसरे पेशवे बालाजी म्हणजेच नानासाहेब पेशवे यांच्या हस्ते झाले होते.1755 मध्ये ह्या मंदिराच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. तब्बल 31 वर्षाच्या कालावधीनंतर 1786 मध्ये ह्या मंदिराचे बांधकाम पुर्णत्वास आले होते.

त्र्यंबकेश्वर मंदिर माहिती 

त्र्यंबकेश्वर मंदिराचे रहस्य

त्र्यंबकेश्वर ज्योर्तीलिंगाची सगळयात असाधारण बाब अशी आहे की ह्या ज्योर्तीलिंगाची तीन मुखे आहेत. ह्या लिंगाच्या चारही बाजुला एक रत्नजडीत मुकुट देखील ठेवण्यात आले आहे. ह्या मुकुटविषयी असे देखील म्हटले जाते की हे मुकुट पांडवाच्या कालावधीपासुन इथे ठेवले गेले आहे. ह्या मुकुटामध्ये अनेक अनमोल रत्ने देखील आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हा मुकुट भाविकांना फक्त सोमवारच्या दिवशी चार ते पाच वाजेपर्यत बघता येतो. 

त्र्यंबकेश्वर मंदिरा जवळील पाहण्यासारखी इतर ठिकाणे :

●     त्र्यंबकेश्वराचे मंदिर 

●     कुशावर्ता कुंड 

●     ब्रम्हगिरी पर्वत 

●     गंगाद्वार 

●     नील पर्वत 

●     अंजनेर पर्वत 

●     गजानन आश्रम 

त्र्यंबकेश्वर मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव आणि यात्रा : 

त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शिव शंकर यांना समर्पित केले गेले असल्यामुळे इथे महाशिवरात्री हा सण मोठया उत्सवात साजरा केला जातो. प्रत्येक महाशिवरात्रीला भक्तांची प्रचंड गर्दी असते. हा उत्सव साजरा करत असताना त्र्यंबकेश्वर महाराजांचा सोन्याचा मुखवटा पालखीत बसविला जातो आणि गावभर तो फिरवला जातो. त्यानंतर कुशावर्त येथे अंघोळ वगैरे केली जाते आणि त्यानंतर सोन्याचा मुखवटा पुन्हा मंदिरात आणुन ठेवला जातो.

त्र्यंबकेश्वर मंदिराची अधिकृत वेबसाईट : 

www.trumbakeshwartrust.com

त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास : 

एकदा महर्षी गौतम यांच्या पत्नीवर तपोवनात राहत असलेल्या इतर ब्राम्हणांच्या पत्नी निराश झाल्या होत्या. मग आपापल्या पत्नीच्या म्हणण्यानुसार सर्व ब्राम्हणांनी मिळुन श्री गणेशाची आराधना केली. श्री गणेश त्यांच्या तपस्येवर खुश होऊन त्यांना वरदान देण्यासाठी प्रकट झाल्यावर सर्व ब्राम्हण गौतम ऋषी यांना आश्रमातुन बाहेर काढण्याचे वरदान मागतात.

मग सर्व ब्राम्हणांच्या हट्टामुळे श्री गणेश एका गायीचे रूप धारण करतात आणि गौतम ऋषी यांच्या शेतात जाऊन श्रीगणेश वास्तव्य करु लागतात. जेव्हा एकेदिवशी गौतम ऋषी गायीला चारा खाऊ घालत असतात तेव्हा ती गाय मरण पावते. गौतम ऋषी यांच्यावर गोहत्येचे पाप होते ह्या घटनेनंतर गौतम ऋषी आपल्या पत्नी आहिल्यासोबत आश्रम सोडुन निघुन जातात.

प्रायश्चित म्हणुन गौतम ऋषींनी पृथ्वी प्रदक्षिणा देखील केली. ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारल्या. गौतम ऋषींची तपश्चर्या बघुन शिवशंकर प्रसन्न होतात मग गौतम ऋषी महादेवाकडे गोहत्येच्या पापापासुन मुक्त होण्याचे वरदान मागतात. तेव्हा शिवशंकर सर्व सत्य गौतम ऋषी यांना सांगतात पण गौतम ऋषी शिवशंकर यांना सर्व ब्राम्हणांना माफ करण्यास सांगतात.

गौतम ऋषींची आराधना बघुन सर्व ब्राम्हण, देवदेवता, हे भगवान शिव यांना तिथेच वास्तव्य करण्याचा आग्रह करतात. मग सर्वाच्या प्रार्थनेला संमती देत भगवान शिव त्र्यंबकेश्वर इथेच ज्योर्तीलिंग ह्या नावाने स्थित होतात.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी विशेष या पानाला नक्की भेट द्या.


error: Content is protected !!