सतत कॉम्पुटर वर काम करत आहात? डोळ्यांचे व्यायाम करा आणि डोळ्यांची काळजी घ्या

शेअर करा

डोळ्यांचे व्यायाम आणि डोळ्यांची काळजी

हल्ली डोळ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. स्मार्टफोन, संगणक तसेच इतर विविध कारणांनी सातत्याने आपल्या डोळ्यांवर ताण पडत असतो. कित्येकदा आपण डोळ्यांना त्रास होतील अशा गोष्टी वारंवार करत असतो. अशाच चुका टाळण्यासाठी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि डोळ्यांचे व्यायाम याबद्दल जाणून घेऊयात. 

डोळ्यांचे व्यायाम:

1) जर तुम्ही काम करत असाल तर डोळ्यांची सतत उघडझाप करत राहा. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणार नाही. तसेच डोळे जळजळण्याची समस्या कमी होईल.

2) दिवसातून कमीत-कमी चार ते पाच वेळा डोळे थंड पाण्याने धुवा. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी होईल.

3) कामाच्या वेळी दिवसातून दोन-वेळा डोळ्यांचे व्यायाम करा. पाच मिनिटे डोळ्यांची बुबुळे उजव्या आणि डाव्या बाजूला फिरवा.

4) संगणक किंवा लॅपटॉपवर काम करताना खोलीतील विजेचा दिवा सुरू ठेवा. यामुळे कॉम्प्युटर मधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचा डोळ्यांवर कमी परिणाम होईल.

5) संगणकावर किंवा कोणतेही काम करताना दर चाळीस मिनिटानंतर विश्रांती घ्या. 5 मिनिटे डोळे बंद ठेवा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल.

6) चेहरा व डोळे यांच्या स्नायूंना आराम मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे व खिडकीतून बाहेर पहावे. हिरवळीकडे पाहणे डोळ्यांसाठी चांगले आणि फायदेशीर आहे.

7) ओलाव्याच्या अभावामुळे डोळ्यांना खाज सुटते. तसेच डोळे लालसर होतात आणि डोळ्यांची जळजळ होते. त्यामुळे काम करते वेळी डोळ्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. डोळ्यांचे व्यायाम करा.

8) वारंवार डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, खाज सुटणे या समस्या असतील तर डॉक्टरांना भेटा.

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी डोळ्यांचे व्यायाम

डोळ्यांची काळजी:

तुमच्या कडून खालीलपैकी चुका तर होत नाहीत ना? 

1) Contact lens घालून झोपणे –

मोठ्या संख्येने तरुण आणि कामकरी लोकसंख्या आता त्यांच्या डोळ्यांच्या समस्या सुधारण्यासाठी संपर्क लेंस वर अवलंबून आहेत,पण हि सवय चांगली नाही, आपण कितीही  थकलो असलो तरी रात्री झोपण्यापूर्वी डोळे स्वच्छ धुऊन झोपावे जेणे करून त्रास होणार नाही.   

2)आपल्या डोळ्यांना स्पर्श करणे आणि चोळणे –

काही लोकांना विनाकारण डोळे स्पर्श करण्याची व चोळण्याशी सवय असते कि जी नक्कीच चांगली गोष्ट नाही 

3) आपल्या नियमित डोळा तपासणीस विलंब करणे –

बहुतेक लोक त्यांच्या डोळ्यांना त्रास होत नाही किंवा गंभीर समस्या असल्याशिवाय डोळ्यांच्या तज्ज्ञांकडे जात नाही . त्याऐवजी, दुर्लक्षामुळे प्रारंभिक टप्प्यात समस्या सोडली जाऊ शकते.

4) electronic screens, computer, mobile, TV यांचा अतिरेक –

सर्वेनुसार, साधारण: बहुतेक लोक संगणकाच्या, टीव्ही किंवा मोबाईल फोनच्या वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक स्क्रीनमध्ये चिकटले जातात, दररोज सुमारे बारा ते पंधरा तास. डोळे कार्यक्षम रीतीने कार्य करण्यासाठी पुरेशी विश्रांती गरजेची आहे.

5) जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर हे तुमच्या डोळ्यांसाठी घातक आहे. संशोधनानुसार धूम्रपान करण्यामुळे वय-संबंधित मॅकिलेटर, मोतीबिंदू आणि ऑप्टिक न्यूरो डिफेन्स वाढविण्याचा धोका वाढला आहे, ज्यामुळे अंधत्व येऊ शकते.

निष्कर्ष :

आपल्या सर्व अवयवांपैकी डोळे हे अत्यंत महत्वाचे आहेत. कारण जर दृष्टी नसेल तर हे सुंदर जग आपल्याला पाहता येणार नाही. तसेच डोळ्यांची समस्या निर्माण झाली तर इतर अवयवांवर देखील परिणाम होऊ शकतो. आज-कालच्या गॅझेट च्या जमान्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

error: Content is protected !!