जो बायडन कोण आहेत?

शेअर करा

जो बायडन कोण आहेत (उर्फ जोसेफ बायडन)?

नाव: जोसेफ रॉबिनेट बायडेन जुनिअर 

जन्म: २० नोव्हेंबर १९४२, पेन्सल्वेनिया

व्यवसाय: लेखक, राजकीय नेता, वकील

जो बायडेन यांचा जन्म पेन्सल्वेनिया मध्ये झाला. त्यांचे उच्चशिक्षण हे डेलवेअर विद्यापीठ येथे झाले तसेच सायराक्यूस विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. १९६६ मध्ये मिलिया हंटर यांच्या सोबत जोसेफ यांचे लग्न झाले. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी बायडेन सिनेटर झाले आणि तेव्हा पासून आत्ता पर्यंत त्यांची तब्बल ३५ वर्षाची राजकीय कारकीर्द आहे. जाणून घेऊया जो बायडन कोण आहेत ? आणि त्यांचा जीवन प्रवास.

जो बायडन कोण आहेत | बायडेन यांच्या वयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या. बायडेन यांचे वडील एक उद्योजक होते; परंतु व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे त्यांना व्यवसाय सोडावा लागला आणि त्यांना नोकरी करावी लागली. बायडेन  यांची पत्नी मिलिया व मुलगी यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे बायडेन व्यथित झाले आणि राजकारण सोडण्याचा मनःस्तिथीत होते. काही कालावधीनंतर बायडेन यांनी दुसरे लग्न केले.

कोण आहेत जो बायडन कोण आहेत

भारतातील निवडणूक पद्धत आणि अमेरिकेतील निवडणूक पद्धत वेगळी आहे. यामध्ये इलेक्टोरिअल मते, सिनेटर आणि बऱ्याच गोष्टी समजण्यास किचकट आहेत.अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जोसेफ यांना भरघोस मते मिळाली आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले. या आधी ते उपराष्ट्राध्यक्ष या पदावर देखील राहिलेले आहेत. तसेच बैडें यांनी बाराक ओबामा यांच्यासोबत काही कालावधी साठी काम केले आहे.

निवडणुकीच्या आधी अध्यक्षीय वादविवाद (presidential debate) आयोजित केला जातो, ज्या मध्ये दोन्ही उमेदवार हे समोरासमोर आपले मते जाहीर करतात आणि त्यावर वादविवाद देखील होतो.

भारतात जसे लोकसभा सदस्य खासदार असतो तसेच अमेरिकेत सिनेट असते आणि सिनेटर म्हणजेच सिनेटचा सदस्य. आत्तापर्यंत सहा वेळेस बायडेन यांची सिनेटर म्हणून निवड झालेली आहे. १९७० पासून जोसेफ राजकारणात आहेत, त्यांचे वय ७७ आहे.

पाकिस्तान आणि चीन यांच्या विरोधात भारतासोबत आहोत असे बरेच आधी त्यांनी जाहीर केले होते. तसेच पर्यावरण या विषयी बायडेन अधिक जागरूक आहेत. निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ग्लोबल वॉर्मिंग, वातावरण बदल, प्रदूषण यावर काम करणार असेही ते बोलले आहेत. तसेच बायडेन यांनी कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी शिफारस केली आणि त्या विजयी झाल्या.

error: Content is protected !!