कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळं माहीती 

शेअर करा

 कोकणातील प्रसिद्ध पपर्यटनस्थळं माहीती 

आपण अनेकवेळा कुठेतरी कुटुंबासोबत तसेच मित्रांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखत असतो. पण आपण ठरवतो तो कोकण पर्यटनाचा.कारण कोकणतील जगप्रसिदध किल्ले, हिरवेगार वातावरण, समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांचे मन वेधुन घेत असतात. म्हणुन जास्तीत जास्त पर्यटक हे कोकण फिरण्यालाच अधिक पसंती देत असतात. ह्याचमुळे कोकणाला महाराष्टाचा कँलिफोर्निया असे देखील म्हटले जाते.

आज आपण ह्याच कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत की कोकणात प्रमुख पर्यटन स्थळे किती आहेत व ती कोणकोणती आहेत? इत्यादी बाबींविषयी आजच्या लेखातुन आपण थोडक्यात जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळं :  

1) गणपतीपुळे : 

गणपतीपुळे हे ठिकाण प्रसिदध आहे विशेषकरून गणपतीच्या मंदिरासाठी. गणपती पुळे हे अरबी समुद्राच्या किनारी असलेले प्रसिदध तीर्थक्षेत्र आहे.ह्या ठिकाणी दर्शनासाठी महाराष्टातुन भाविक तर येतातच पण महाराष्टाच्या बाहेरील भाविक पण येथे खास दर्शनासाठी तसेच पर्यटनासाठी येत असतात. येथे दर वर्षी 25 ते 30 लाख भाविक तसेच पर्यटक येत असतात. महाराष्ट राज्य परिवहन मंडळ हे आपल्याला मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांतुन बसची सेवा पुरविण्याचे काम देखील करते. सहयाद्री पर्वतामध्ये डोंगराळ विगागात वसलेली मुर्ती आणि जवळच पश्चिम दिशेला असलेला अरबी समुद्र हे ह्या मंदिराचे वेगळेपण आहे. 

2) लोकमान्य टिळक सदन : 

लोकमान्य टिळक सदन हे रत्नागिरी जिल्हयातील खुप मोठे आणि जगप्रसिदध पर्यटन स्थळ आहे. भारतीय असंतोषाचे जनक म्हणुन ओळखले जाणारे लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळ रत्नागिरी जिल्हयातील हे ठिकाण आहे. 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्हयात असलेल्या चिखली नावाच्या गावी लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला होता. 

3) दापोली : 

दापोलीलाच छोटे महाबळेश्वर असे देखील म्हटले जाते. मुंबई पुणे शहरापासुन खुप जवळ अंतरावर असलेले अरबी समुद्राच्या कुशीमध्ये तसेच सहयाद्रीच्या हिरवळ वातावरणात वसलेले थंड ठिकाण म्हणजेच दापोली. शैक्षणिकदृष्टया पाहावयास गेले तर डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे हरणे बंदर तसेच हरणे दुर्ग ह्या ठिकाणी मासे लिलाव कसा केला जातो याचा देखील अनुभव आपल्याला घेण्यास मिळतो. 

4) रायगड किल्ला :

रायगड हा एक ऐतिहासिक किल्ला म्हणुन जगभर ओळखला जाणारा शिवकालीन किल्ला आहे. रायगड किल्ल्यावर एक मानवनिर्मित तळ बनविण्यात आले आहे ज्याला गंगासागर तलाव असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सदर किल्लयाची डागडुजी केली आणि ह्या किल्लयाला मराठा सामार्ज्याची राजधानी म्हणुन घोषित देखील केली. सदर किल्यावर खुप मोठा इतिहास घडलेला आहे त्यामुळे दुरदुरचे इतिहासप्रेमी पर्यटक ह्या ठिकाणाला भेट देण्यासाठी येथे येत असतात.

5) आरे वारे समुद्रकिनारा : 

गणपती पुळयावरून जेव्हा आपण निघतो, बारा किलोमीटर अंतरावर एक अतिशय चित्त वेधून घेणारा निसर्गाचा अविष्कार पाहावयास मिळतो. समुद्रामध्ये शिरलेल्या डोंगराच्या टोकामुळे इथे दोन जूळे समुद्रकिनारे तयार झालेले दिसतात.ज्यांच्यामधील एकाचे नाव आहे आरे आणि एकाचे वारे. इथे फिरायला येणारे पर्यटक अक्षरश आरे वारेच्या ह्या सुंदर किनार दृश्यांच्या प्रेमात पडुन जातात. इतके मोहक असे इथले दृश्य आहे. 

6) मुरूड जंजिरा : 

मुरूड जंजिरा हा भारताच्या महाराष्ट राज्यातील मुरूड गावामध्ये वसलेला किल्ला आहे. मुरूड जंजिरा किल्ला हा पर्यटनाच्या दृष्टीने खुपच नावाजलेला किल्ला आहे. हा किल्ला 350 वर्ष इतका जुना आहे. भारतातील पश्चिम भागातील हा असा एक किल्ला आहे जो कधीच कोणाकडुन जिंकला गेलेला नाही म्हणुन याला अजय किल्ला असे देखील म्हटले जाते. 

7) किहिम समुद्रकिनारा :

किहिम हा अलिबागपासुन 12 किलोमीटर अंतरावर असलेला निसर्गाची छाया प्राप्त झालेल्या समुद्रकिनारांच्या यादीतील एक समुद्रकिनारा म्हणुन ओळखला जातो. अलिबाग रेवस रस्त्यावरील चढता किहीम फाटा पार केल्यानंतर पश्चिमेकडे जाणारा हा मार्ग किहीम गावातुन सरळ किहिमच्या समुद्रकिनारी जातो. जर तेथील निसर्गसौदर्याचे आपल्याला छायाचित्र घ्यायचे असेल तर तिथे छायाचित्रणासाठी भरपुर प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य स्थळ आढळुन येतात. ज्यांचे छायाचित्रण करून आपण निसर्गाच्या ह्या सुंदर स्थळाच्या आठवणी आपल्या कँमेरात कैद करू शकतो. 

 8) थिबा राजवाडा : 

थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशातील थीबा नावाच्या राजाला कैद करून ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी रत्नागिरी जिल्हयात बांधलेला हा एक राजवाडा आहे. हा राजवाडा 1910 मध्ये बांधण्यात आला होता.असे म्हटले जाते की 1916 पर्यत ह्या राजवाडयात ब्रम्हदेशाचे राजा तसेच राणी दोघेही इथे वास्तव्यास होते. ह्या राजवाडयात थिबाने जपुन ठेवलेल्या तसेच वापरलेल्या गोष्टी येथे आपणास पाहायला मिळतात. तसेच ह्या राजवाडयात वस्तुसंग्रहालय देखील पाहावयास मिळते.

9) श्रीवर्धन बीच : 

श्रीवर्धन हे एक ऐतिहासिक ठिकाण म्हणुन आपणा सर्वाना परिचित आहे. कारण यात्रा करत असताना पाच पांडवांनी ह्या ठिकाणी भेट दिली होती असे ह्या ठिकाणाविषयी म्हटले जाते. सोळव्या शतकामध्ये हे व्यापाराचे एक प्रमुख केंद्र म्हणुन प्रचलित होते. 

10) तारकरली बीच :

तारकरली हे महाराष्टातील सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यात वसलेले गाव आहे. आकर्षक असा समुद्रकिनारा लाभलेले हे महाराष्टातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. सदर गाव हे तेथे साजरा होत असलेल्या रामनवमीच्या उत्सवामुळे देखील खुप प्रसिदध आहे.


निसर्ग

error: Content is protected !!