Kalonji Meaning in Marathi
आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात ज्यांचा उपयोग आपण फक्त निरनिराळी व्यंजन तयार करण्यासाठी तसेच त्यातील चविष्ठतेत वाढ होण्यासाठी न करता त्याचा वापर आपण औषध म्हणुन देखील आपल्या दैनंदिन जीवणात करत असतो. आजच्या लेखात आपण अशाच एका महत्वाच्या धान्य/पदार्थाविषयी जाणुन घेणार आहोत ज्याचे नाव कलौंजी असे आहे आणि ज्याला मराठीत काळे बियाणे असे देखील संबोधिले जाते.
कलौंजी म्हणजे काय? What is Kalonji meaning in Marathi?
कलौंजी म्हणजे काळे बियाणे. यालाच इंग्रजीमध्ये Nigella Sativa तसेच black cumin असे देखील म्हणतात. हे एक औषधी रोपटे असते आणि त्याच्या बीजालाच कलौंजी म्हटले जाते. कलौंजी हे धान्य/बिया आहेत ज्याचा वापर स्वयंपाकघरात मसाल्याच्या स्वरूपात देखील केला जातो.
कलौंजी हे एक रणकुलैसी कुळातील एक रोपटे आहे.आणि हे एक असे रोपटे आहे जे संपुर्ण भारतात सर्व ठिकाणी उपलब्ध असते. ह्या रोपटयाची बीजे ही काळया रंगाची असतात. कलौंजी दिसायला तिळाच्या दाण्यासारखा असते आणि याचा आकार हा अंडाकृती असतो आणि हे धान्य कोणत्याही दुकानात सहज मिळू शकेल. कलौंजीलाच काळे बीज तसेच काळे जिरे असे देखील म्हटले जात असते. (Kalonji Meaning in Marathi).
कलौंजीचे फायदे
पाहायला गेले तर कलौंजीचे अनेक फायदे आहेत. पण कलौंजीच्या काही प्रमुख फायद्यांविषयी आज आपण जाणुन घेणार आहोत.
- कलौंजी हा एक असा पदार्थ आहे ज्याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराला लोह. तसेच खनिजांचा पुरवठा होत असतो. कलोजीचा वापर आपण रोजच्या भाज्यांमध्ये सुदधा करू शकतो. त्याचबरोबर कलौंजीचा वापर घरगुती लोणचे बनवण्यासाठी सुदधा करू शकतो.
- आपले केस जर गळत असतील तर आपण कलौंजीच्या तेलाचा रस आपल्या डोक्याला लावायला हवा याने आपली केसगळती थांबण्यास मदत होते.
- खुप जणांना अतिगोड सेवनामुळे डायबेटिस म्हणजेच मधुमेहाचा त्रास जाणवत असतो. अशा मधुमेहाच्या रूग्णांसाठी कलौंजीचे तेल फार लाभदायक ठरत असते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तीने हे तेल पिले तर त्याचा मधुमेह देखील बरा होत असतो.त्याचबरोबर त्याच्या शरीरामध्ये जी शर्करा वाढलेली असते ती देखील आटोक्यात येते.

- कलौंजीचा उपयोग हा त्वचेचे आजार बरे करण्यासाठी देखील होत असतो. कलौंजीच्या तेलाने मालिश केल्याने त्वचेचे अनेक आजार देखील बरे होतात.
- कलौंजीचा वापर हा तोंडावरील पुळया घालवण्यासाठी देखील केला जात असतो. कलौंजीचे चुर्ण लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील पुळया तसेच व्रण नाहीसे होतात.
- कानाच्या समस्यांवर देखील कलौंजीचा वापर केला जात असतो.समजा आपला कान दुखत असेल किंवा कानाला सुज वगैरे आली असल्यास ती सुज घालवण्यासाठी कान दुखणे थांबवण्यासाठी आपण कलौंजीच्या तेलाचा वापर करू शकतो.यासाठी आपल्याला फक्त तेल थोडेसे गरम करावे आणि कानात ओतावे.असे केल्याने आपला कान दुखणे थांबेल. आपल्या कानाला आलेली सुज जाईल आणि आपला कान बरा होण्यास मदत होईल.
- आपल्या पोटामध्ये जर कृमी झालेले असतील तसेच आपले पोट दुखत असेल तर कलौंजीमध्ये मध मिसळुन त्याचे रात्री झोपण्यापुर्वी सेवन करावे याने आपल्या पोटातील कृमी मरतात. तसेच पोट दुखणेही बंद होत असते. (Kalonji Meaning in Marathi).
कलौंजीचा आयुर्वैदिक वापर :
- कलौंजीचा वापर हा युनानी औषधनिर्मितीसाठी केला जात असतो.
- कलौंजीच्या तेलाचा वापर हा पँरालिसीस बरा करण्यासाठी देखील केला जात असतो.पँरालिसीस असलेल्या व्यक्तीच्या अंगाला कलौंजीच्या तेलाने मालिश करावी याने त्याचा पँरालिसीस लवकर बरा होतो.
- कलौंजीच्या तेलाचा वापर रक्तवाढीसाठी सुदधा केला जात असतो.रक्तवाढीसाठी पुदिनाची पाने ही कलौची तेलासोबत एक ग्लास पाण्यात मिसळुन सकाळी प्राशन केल्याने आपल्या शरीरात रक्ताचा पुरवठा वाढत असतो.
- कलौंजीचा वापर हा मुतखडा बरा करण्यासाठी देखील केला जात असतो.
- कलौंजीचे सेवन केल्याने आपल्याला कँन्सर सोबत लढण्याची टाकत वाढते.
- कलौंजीच्या सेवनाने आपल्याला कधीही लठ्ठपणाची समस्या उद्भवत नाही.
- कलौंजी खाल्लयाने आपल्या शरीरातील काँलेस्टेराँलची पातळी कमी होत असते.
कलौंजीमुळे होणारे दुष्परिणाम कोणकोणते?
- कलौंजीचे तेल जर आपण त्वचेवर लावत असु तर काही जणांना याची अँलर्जी असल्यामुळे side effect देखील होण्याची शक्यता असते.
- कलौंजी सेवन जर आपण मसाल्यादवारे केले तर त्याचा काही side effect वगैरे नसतो. पण औषध म्हणुन जर आपण याचे सेवन करत असु तर कलौंजीचे सेवन करण्याआधी आपण तज्ञ डाँक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. (Kalonji Meaning in Marathi).
अशाच आरोग्यविषयक माहिती साठी आरोग्य या पानाला नक्की भेट द्या.