ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी?

शेअर करा

ऑनलाईन शॉपिंग

आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही तर लाखोची खरेदी करू शकतो. 

पण ज्या पदधतीने आँनलाईन खरेदी केल्याने आपल्याला आपला वेळ, उर्जा यांची बचत करून कोणतीही वस्तु, प्रोडक्ट, सर्विस घरबसल्या प्राप्त करता येते. याने आपल्या पैशांची देखील आँनलाईन शाँपिंग केल्यामुळे बचत होते. असे अनेक फायदे आपणास पाहायला मिळतात.

याचप्रमाणे आँनलाईन शाँपिंग केल्याने आपल्याला काही नुकसान तसेच अडीअडचणींना देखील सामोरे जावे लागत असते. ह्या अशा अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागु नये. म्हणुन आपण आँनलाईन शाँपिंग करताना काही काळजी घेणे देखील गरजेचे असते.

आजच्या लेखातुन आपण आँनलाईन शाँपिंग करताना  कोणती काळजी आपण घ्यायला हवी हेच जाणुन घेणार आहोत.

ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय?

आँनलाईन शाँपिंग ही एक अशी सुविधा आहे जी आपल्याला घरबसल्या कोणत्याही वस्तुची, प्रोडक्टची खरेदी करण्यासाठी वापरता येत असते. यात आपण कोणत्याही आँनलाईन शाँपिंग वेबसाईट तसेच शाँपिंग अँपचा वापर करून घरबसल्या क्रेडिट कार्डचा वापर करून कोणतीही वस्तु खरेदी करून घरपोच प्राप्त करू शकतो.  

आँनलाईन शाँपिंग कशी केली जाते?

आँनलाईन शाँपिंग करण्यासाठी आपल्याला ज्या वेबसाईट तसेच अँपचा वापर करून कोणतीही वस्तु तसेच प्रोडक्ट खरेदी करावयाचे असते आधी त्या वेबसाईट तसेच अँपवर जावे लागते.

मग आपण आपल्याला जी वस्तु खरेदी करावयाची आहे. तिची किंमत बघुन ती सिलेक्ट करून त्याचे क्रेडिट कार्ड तसेच इतर आँनलाईन ट्रान्झँक्शन मिडियम द्वारे पेमेंट करून झाल्यावर आँनलाईन घरपोच ती वस्तु आँडर्र करू शकतो.

यात आपण कपडे,घरगुती वस्तु, किराणा, पुस्तके, इत्यादी सर्व काहींची खरेदी करू शकतो. तसेच आपण जेवणसुदधा आँनलाईन आँडर्र करू शकतो.

यात आपली आँडर्र कुठपर्यत पोहचली आहे हे देखील आपण चेक करू शकतो. तसेच त्या आँडर्रला आपल्याला आवश्यकता नसल्यास कँन्सल देखील करता येत असते.

आँनलाईन शाँपिंग का केली जाते?

आपण आँनलाईन शाँपिंग करण्याची अनेक कारणे आहेत. ज्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

आपण आँनलाईन शाँपिंग करण्याची अनेक कारणे असतात. ज्यात वेळेची बचत करणे, उर्जेची बचत करणे, कोणतीही वस्तु खरेदी करण्यासाठी शाँपिंगसाठी जाण्या येण्याचा जो त्रास तसेच उर्जा तसेच पैशांचा खर्च करावा लागतो तो खर्च तसेच त्रास आपल्याला आँनलाईन शाँपिंग केल्याने होत नाही. कारण इथे आपल्याला फक्त आँनलाईन आँडर्र करावी लागते. तसेच आपल्याला हवी ती वस्तु आपल्याला घरपोच प्राप्त होत असते.

तसेच आँनलाईन शाँपिंग केल्यावर आपल्याला आँफलाईन पेक्षा कमी किंमतीत कोणतीही वस्तु खरेदी करता येत असते.

आँनलाईन शाँपिंग केल्याने आपल्याला बँक खात्यात पैसे नसताना देखील क्रेडिट कार्डचा वापर करून कोणतीही वस्तु खरेदी करता येत असते.

ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यायला हवी?

जेव्हाही आपण आँनलाईन शाँपिंग करत असतो तेव्हा आपण काही महत्वाच्या बाबी देखील लक्षात घेणे फार गरजेचे असते. कारण आँनलाईन शाँपिंग करण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसेच काही तोटे देखील असल्याचे आपणास दिसुन येते.

म्हणुन आपण आँनलाईन शाँपिंग करताना पुढील काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.

1) आँनलाईन शाँपिंग कधीही अशा संकेतस्थळावरून करायला हवी जे संकेतस्थळ विश्वसनीय आहे. कोणत्याही अशा अनोळखी संकेतस्थळावरुन शाँपिंग करू नये ज्या विषयी आपल्याला काहीच माहिती नाही. 

उदा, अँमेझाँन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील इत्यादी अशा विश्वसनीय संकेतस्थळांवरून खरेदी करावी.

2) कोणत्याही आँनलाईन संकेतस्थळावरून खरेदी करण्याअगोदर आधी त्या संकेतस्थळावर ई विक्रेत्याचा टोल फ्री संपर्क क्रमांक दिलेला आहे का?आधी हे चेक करावे.

3) सध्या आँनलाईन शाँपिंगमध्ये ग्राहकांची फसवणुक देखील होत असते. त्यामुळे आँनलाईन शाँपिंग करण्याअगोदर आपल्याला आपला ग्राहक संरक्षण हक्काविषयी माहिती असणे फार गरजेचे आहे. जेणेकरून आपल्यासोबत कोणतीही फसवणुक केली गेल्यास आपण त्याविषयी तक्रार देखील करू शकतो.

4) आँनलाईन खरेदी करण्याअगोदर आपण जिथुन खरेदी करतो आहे त्या E-Commerce साईटसची ग्राहक संरक्षण योजना कशी आहे? हे आपण आधी तपासायला हवे.

5) एखादी वस्तु जर आपल्याला परत करायची असेल तर त्याबाबद त्या ई-विक्रेत्याच्या नियम तसेच अटी काय आहेत? हे देखील आपल्याला जाणुन घ्यावे लागेल.

6) कधीही आँनलाईन खरेदी अशाच ठिकाणी अशाच संकेतस्थळावरून आपण करायला हवी जिथे इन्सक्रिप्शनची सुविधा असते. कारण याच्याने खरेदी करत असताना आपण जी आपली बँक डिटेल तिथे देतो ती सर्व माहिती सुरक्षित राहत असते.

7) आपण जी वस्तु आँनलाईन खरेदी केली आहे तिचा दर्जा उत्तम आहे का नाही? हे देखील तपासुन घ्यायला हवे. 

8) कोणतीही वस्तु आँनलाईन आँडर्र केल्यानंतर त्या वस्तुचे आपण जे बील क्रेडिट कार्डने पेड केलेले असते. ते तपासुन घ्यावे की आपण जेवढया किंमतीत वस्तु खरेदी केली आहे? तेवढेच बिल आपल्या क्रेडिट कार्डचे आलेले आहे का? का त्यापेक्षा जास्त आलेले आहे? याची एकदा शहानिशा देखील करावी.

9) आपण आँनलाईन एखादे पार्सल तसेच वस्तु मागवली असेल तर ती वस्तु तसेच पार्सल उघडुन आधी त्याचा व्हिडिओ तयार करावा म्हणजे त्यातील वस्तु खराब असतील किंवा आपल्याला चुकीची आँडर्र मिळाली असेल तर आपण व्हिडिओ दाखवून त्याचा पुरावा दाखवू शकतो.

10) एखादी महाग वस्तु जर आँनलाईन कमी किंमतीत विकली जात असेल तर लगेच ती खरेदी करू नये  याचा विचार आपण करायला हवा की एवढी महाग वस्तु समोरचा आपल्याला इतक्या स्वस्तात का देतो आहे? कारण कदाचित एखाद्या वेळी ती वस्तु तसेच प्रोडक्ट खराब तसेच नीच्च दर्जाची, खराब असु शकते.

11) अशा संकेतस्थळावरून कधीही खरेदी करावी जिथुन खरेदी केल्यास आपल्याला एखादी वस्तु खराब तसेच चुकीची प्राप्त झाल्यास ती आपल्याला रिटर्न तसेच एक्सचेंज देखील करून मिळत असते.

12) आपल्या डेबिट तसेच क्रेडिट कार्डचा पीन देऊ नये. सर्व माहिती स्वता भरावी.

13) कोणत्याही वेबसाईट तसेच अँपद्वारे आँनलाईन शाँपिंग करण्याअगोदर त्या वेबसाईट तसेच अँपवरून शाँपिंग केलेल्या जुन्या ग्राहकांचे अनुभव देखील वाचावे.

14) जर आपण आँनलाईन शाँपिंग करून झाल्यावर डिजीटली पेमेंट करत असु तर आपण आपल्या बँक डिटेल्सला हँकर्सपासुन वाचवण्यासाठी आपला क्रेडिट कार्डचा पिन, पासवर्ड वेळोवेळी बदलत राहायला हवा.

15) आँनलाईन शाँपिंग करताना आपण कँश आँन डिलीव्हरी चा पर्याय निवडावा याने आपली बँक डिटेल हँक होण्याची शक्यता कमी असते. पण याचा एक तोटा देखील आपण लक्षात घ्यायला हवा की कँश आँन डिलिव्हरी पेमेंट करण्याअगोदर आपण जी वस्तु मागवली आहे ती उत्तम दर्जाची आहे का नाही? चुकीचे पार्सल तर आपल्याला मिळाले नाहीये ना? याची चौकशी करूनच पेमेंट करावे. कारण वस्तु खराब असल्यास तसेच चुकीची वस्तु डिलिव्हर झाल्यास कँश आँन डिलिव्हरी पेमेंट परत मिळवताना आपल्याला खुप त्रास होतो.

16) आँनलाईन खरेदी करत असताना आपण ज्या वेबसाईटवरून शाँपिंग तसेच खरेदी करतो आहे त्या वेबसाईटचा यु-आर-एल आधी चेक करावा. कारण तो यु-आर-एल एचटीटीपीएस नसेल तर समजुन घ्यावे सदर वेबसाईट गुगलने सिक्युअर केलेली नाहीये. म्हणुन आपण ह्यावर विश्वास ठेवू शकत नाही.

17) आपण जी वस्तु आँनलाईन खरेदी करतो आहे तिची त्या कंपनीकडुन गँरंटी तसेच वाँरंटी दिली जाते आहे का?हे देखील एकदा चेक करून घ्यावे.

अशा पदधतीने आज आपण आँनलाईन शाँपिंग करताना कोणती दक्षता बाळगायला हवी? जेणेकरून आपली फसवणुक होणार नाही? हे सविस्तर जाणुन घेतलेले आहे.


error: Content is protected !!