वाचन म्हणजे एक असा छंद जो एकाग्रता आणि ज्ञान दोन्ही गोष्टीसाठी फायद्याचा ठरतो. पुस्तकं वाचन केल्याने एकाग्रता वाढते तसेच वाचणामुळे आपल्याला ज्ञान देखील प्राप्त होते. पूर्वी ग्रंथाल्यामध्ये जाऊन पुस्तकं आणून वाचन झाले की परत द्यायचे. मात्र आत्ता फारशी ग्रंथालय नाहीत. याला कारण म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती. आता एका क्लिक वर पुस्तकं मागवता येतात किंवा ई-बुक डाउनलोड करून ताबडतोब आपल्या मोबाईल वर वाचन सूरू करता येते.
ई-बुक म्हणजे काय ? What is E-book in Marathi?
E-Book – Electronic Book ईलेक्ट्रॉनिक बुक. एखाद्या पुस्तकाची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत म्हणजे ई-बुक होय. मोबाईल, कॉम्पुटर, टॅबलेट अशा विविध इलेक्ट्रॉनिक स्क्रीन वर पुस्तकं वाचण्यासाठी ई-पुस्तक ही संकल्पना अस्तित्वात आली. छापलेल्या पुस्तकाची आवृत्ती जशास तशी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. ज्याप्रकारे महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून जतन केली जातात. त्याच प्रकारे छापील पुस्तक हे ई-पुस्तक (पीडीएफ) स्वरूपात असते.
अमेझॉन किंडल सारख्या सेवेमुळे एका क्षणात हेवे ते पुस्तक वाचता येते. पुस्तक वाचण्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासत नाही.इंटरनेटवर अनेक मराठी ई-पुस्तक मोफत उलब्ध आहेत. पुस्तके मोबाइल उघडा आणि पुस्तक वाचनास सुरुवात करा. मोबाइल वर पुस्तक वाचनाची सोय उपलब्ध असून काही वाचकास पुस्तकाची प्रत हातात घेऊन वाचल्याशिवाय समाधान होत नाही. कारण मोबाईल अथवा कॉम्पुटर वर पुस्तक वाचताना बऱ्याचवेळा इतर नोटिफिकेशन वाचनात व्यत्यय आणतात.
पुस्तकाचे आधुनिक रूप
आधुनिक युगात सर्वकाही ऑनलाईन उपलब्ध झाले आहेमी, त्यात पुस्तकाने देखील नवीन रूप घेतले आहे. ई-पुस्तक सारखी सोय असली तरी आजकाल वाचक कमी होत चालले आहेत. व्हिडीओ, ऑडिओ, ओटीटी असे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने पुस्तक वाचन कंटाळवाणे होते. ई-पुस्तक पेक्षा अजून पुढे जाऊन ऑडिओ बुक हा देखील पर्याय आहे. जिथे कमी कष्ट म्हणजेच फक्त ऐकायचे काम आहे

ऑडिओ बुक म्हणजे काय?
कागदावर छापलेली प्रत म्हणजे पुस्तक, पुस्तकाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप म्हणजे ई-पुस्तक आणि ई-पुस्तक पुढील आधुनिक स्वरूप म्हणजे ऑडिओ बुक. पुस्तकामध्ये लिहिलेले शब्द आवाजाच्या स्वरूपात रेकॉर्ड केले जाणे म्हणजेच ऑडिओ बुक होय. वाचनाचे कष्ट न घेता फक्त शब्ध ऐकायचे आहेत. ई-पुस्तक प्रमाणेच ऑडिओ बुक देखील मोबाईल, कॉम्पुटर, टॅबलेट अशा उपकरणांवर ऐकता येते. Audible हा ऑडिओ बुक साठी उत्तम मंच आहे. इथे अनेक उत्तम ऑडिओ बुक उपलब्ध आहेत.
आता पूर्वीसारखे पुस्तकांचा संच बाळगण्याची गरज नाही. मोबाईल मध्ये ई-पुस्तक/ऑडिओ बुक सेव केल्याने प्रवासात अथवा फावल्या वेळात कुठेही वाचन सुरु करता येते. तसेच छापील पुस्तकाच्या किमतीपेक्षा कमी दरात ई-पुस्तक उपलब्ध होतात. वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो. ई-पुस्तक विकत घेण्यासाठी किंवा वाचण्यासाठी अमेझॉन किंडल उत्तम पर्याय आहे.
संबंधित लेख