इथेनॉल बद्दल माहिती. इथेनॉलची निर्मिती, वापर आणि फायदे

शेअर करा

इथेनॉल बद्दल माहिती

इथेनॉल हे एक अल्कोहोल असते. ज्याला एथिल अल्कोहोल असे देखील संबोधित केले जाते. आपल्या देशाचे सरकार आता ऊसापासुन इथेनॉल तयार करण्याबरोबरच तांदुळा पासुन इथेनॉल तयार करण्याच्या तयारीला देखील लागलेले आपणास दिसुन येते आहे.

भारत हा एक असा देश आहे जिथे उसाचे उत्पादन हे फार अधिक प्रमाणात केले जाते. म्हणुन येथे उसाच्या रसापासुन साखर निर्माण केली जात असते. यातुन जी मळी शिल्लक उरते तसेच राहते तिचा वापर इथिल अल्कोहोल तसेच मिथिल अल्कोहोल तयार करण्यासाठी केला जातो. ह्याच इथिल अल्कोहोलचा वापर इथेनॉल म्हणुन केला जात असतो. आजच्या लेखातुन आपण ह्याच इथेनॉल विषयी सविस्तरपणे माहिती जाणुन घेणार आहोत.

इथेनॉल म्हणजे काय?

इथेनॉल हा एक अल्कोहोलचाच प्रकार आहे. जे आपल्याला कुठे प्राप्त होत नसते. ज्याची निर्मिती आपल्याला स्वतः करावी लागत असते. ज्याचा वापर आपण कोणत्याही गाडीमध्ये त्याला पेट्रोलमध्ये मिश्रित करून एक इंधन म्हणुन देखील करू शकतो.

सर्वप्रथम इथेनॉलचा वापर कुठे आणि केव्हा करण्यात आला होता?

इथेनॉलचा वापर जगात सगळयात आधी ब्राझील ह्या देशात 1932 साली करण्यात आला होता. म्हणुन आज ब्राझील ह्या देशात पेट्रोल मध्ये 23 टक्के इथेनॉल देखील समाविष्ट केले जात असते.

इथेनॉलचा इंधन म्हणुन वापर करण्यामागचे सरकारचे मुख्य उददिष्ट काय आहे?

आज आपल्या भारत देशाच्या सरकारचा असा विचार तसेच प्रयत्न देखील चालु आहे की आपण इथेनॉलला पेट्रोलमध्ये टाकुन त्याचा इंधन म्हणुन वापर करायला हवा. हे करण्यामागचे सरकारचे एकच मुख्य उददिष्ट आहे की आज आपण गाडीला इंधन प्राप्त व्हावे म्हणुन जे पेट्रोलवर अवलंबुन आहे. ते बंद झाले पाहिजे.

इथेनॉलचे रासायनिक सुत्र काय आहे?

इथेनॉलचे रासायनिक सुत्र हे C2H5OH असे आहे.

इथेनॉलची निर्मिती कशी होत असते?

तसे पाहायला गेले तर इथेनॉलची निर्मिती उसाच्या उत्पादनापासुन साधारणत होत असते. पण याव्यतीरीक्त आपण इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी इतर साखरेच्या उत्पादनांचा देखील वापर करू शकतो.

इथेनॉलच्या निर्मितीसाठी ऊस,गहु,मका तसेच इतर धान्ये फळे, निरूपयोगी भाज्या इत्यादी अशा सेंद्रिय खत तसेच साखरयुक्त पिक उत्पादनांचा वापर केला जातो. ज्यात 9 ते 25 टक्के साखरेचे प्रमाण असते.

इथेनॉलचा वाहनांमध्ये इंधन म्हणुन वापर करणे निसर्ग तसेच वाहनांच्या सुरक्षेसाठी का गरजेचे आहे?

इथेनॉलला आपण एक इको-फ्रेंडली इंधन म्हणुन ओळखतो. जे पर्यावरणाला कोणतीही तसेच कुठल्याही प्रकारची हानी पोहचु देत नसते. इथेनॉलचा वाहनांमध्ये वापर केल्यामुळे प्रदुषणाचे प्रमाण कमी होत असते. ज्याचा फायदा पर्यावरणाचा समतोल तसेच संतुलन राखण्यासाठी होत असतो. इथेनॉलमुळे पर्यावरणाचे प्रदुषण कमी होत असते. कारण इथेनॉल हे वाहनांच्या इंजिनमधील उष्णतेला बाहेर काढण्याचे काम करत असते.

इथेनॉलचा वापर कुठे आणि कशासाठी केला जातो?

इथेनॉलचा वापर हा विविध ठिकाणी,विविध कारणांसाठी केला जातो आणि ते पुढीलप्रमाणे आहेत :

1) वाहनांमध्ये इंधन म्हणुन पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी :  इथेनॉल ह्या अल्कोहोलचा वापर आपण एक पर्यावरण मित्र म्हणुन पर्यावरणाचे प्रदुषण कमी व्हावे यासाठी इंधन म्हणुन वाहनांसाठी करत असतो.

2) सुगंध तसेच चवीसाठी  : इथेनॉलचा वापर हा एस्टर तयार करण्यासाठी केला जात असतो. एस्टर हा एक विशिष्ट प्रकारचा सुगंधित पदार्थ असतो. ज्याचा वापर आपण सुगंधित अत्तर परफ्युम तयार करण्यासाठी तसेच चवीसाठी देखील करत असतो.

3) शेतीमध्ये : शेती मधील टाकाऊ पदार्थ तसेच निरूपयोगी धान्य तसेच कचरा यांच्या पासुन इथेनॉलची निर्मिती केली जात असते.

 4) गोळया,औषधांमध्ये : वैदयकीय क्षेत्रात अँण्टीसेप्टीक म्हणजे रोगप्रतिकारक म्हणुन याचा वापर केला जातो. तसेच आपल्या मज्जा संस्थेला नियंत्रित ठेवत असलेल्या औषधांमध्ये ह्या इथेनॉलचा वापर केला जात असतो.

5) प्रयोगशाळेत : इथेनॉलचा वापर हा प्रयोगशाळेत वैज्ञानिकांकडुन राँकेट इंधन म्हणुन देखील केला जातो.

6)  अल्कोहोलयुक्त दारूमध्ये : अल्कोहोलयुक्त दारूमध्ये देखील इथेनॉलचा वापर केला जातो. आणि तसे पाहायला गेले तर इथेनॉल हे एक अल्कोहोलच आहे ज्याचे प्रमाण दारूमध्ये देखील आपणास आढळुन येत असते.

इथेनॉलचा वापर करण्याचे फायदे कोणकोणते असतात?

इथेनॉलचा वापर करण्याचे अनेक फायदे आहेत ह्याच कारणामुळे ब्राझील सारख्या देशामध्ये इथेनॉलचा विपुल प्रमाणात वापर केला जाताना आपणास दिसुन येत आहे. इतकेच नाही तर स्वीडन तसेच ब्राझील सारख्या देशात तर इथेलाँनवरच गाडया चालताना दिसत आहे.

इथेनॉलचे फायदे पुढीलप्रमाणे

इथेनॉलचा वापर केल्याने प्रदुषण कमी होत असते. जे पर्यावरणाच्या हितासाठी खुप फायदेशीर आहे.

इथेलाँनचा वापर केल्याने आज जे आपण वाहनांसाठी इंधन म्हणुन पुर्णपणे पेट्रोलवर अवलंबुन तसेच निर्भर आहे ती निर्भरता देखील कमी होत असते. म्हणजेच पेट्रोलची बचत होण्यास मदत होते.

इथेनॉलची निर्मिती जर सुरू झाली तर याचा सगळयात जास्त फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे. कारण इथेलाँनची निर्मिती ही ऊस,मका,गहु धान्य अशा उत्पादनांपासुन केली जात असते. 

भारतात इथेनॉल निर्मितीला प्रारंभ झाला तर शेतकरींना म्हणजेच हे पीक उत्पादन करत असलेल्या उत्पादकांना अधिक रक्कम प्राप्त होणार आहे.

इथेनॉलचा वापर केल्याने कार्बन मोनाँक्साईड सल्फर डाय आँक्साईड सारख्या घातक वायुंचे उत्सर्जन कमी होत असते.

इथेनॉलचा वापर केल्याने नायट्रोजन आँक्साईडचे उत्सर्जन देखील कमी होत असते.

साखर कारखानदारांना एक नवीन उत्पन्नाचे स्रोत तसेच माध्यम प्राप्त होईल.

इथेनॉलचा वापर केल्याने कार्बन डाय आँक्साईडचे प्रमाण कमी होईल ज्याच्यामुळे आपल्याला हा फायदा होईल की पर्यावरणाचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.

दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्यामुळे जो त्रास वाहन चालकांना होतो आहे त्या वाढत्या किंमतीच्या त्रासापासुन कायमची मुक्ती मिळणार आहे.

भारतात इथेनॉलची निर्मिती करणे शक्य आहे का?

आज आपल्याला जर इंधनासाठी सदैव पेट्रोल वर अवलंबुन राहणे बंद करायचे असेल तर आपल्या देशात जास्तीत जास्त इथेनॉलची निर्मिती व्हायला हवी. पण खुप जणांना हा देखील प्रश्न पडतो की भारतामध्ये इथेनॉलची भरपुर प्रमाणात निर्मिती होऊ शकते का?

तर आपल्या ह्या प्रश्नाचे उत्तर आहे हो भारतात भरपुर इथेनॉलचे उत्पादन तसेच निर्मिती केली जाऊ शकते. कारण असे की इथेनॉलची निर्मिती ही मुख्यकरून ऊसापासुन केली जात असते. आणि आपला भारत देश हा ऊस उत्पादनात दितीय क्रमांकावर आहे. आणि भारतात ऊसापासुन इथेनॉलची निर्मिती केली गेल्यास ऊस उत्पादकांना चांगला नफा प्राप्त होणार आहे.


error: Content is protected !!